धमकीप्रकरणी शिक्षण संस्था चालकाविरोधात गुन्हा

पिंपरी – बंदुकीचा धाक दाखवत भोसरी येथील हॉटेल व्यवस्थापकाला धमकी देणाऱ्या एका शिक्षण संस्था चालकाविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यशवंत बाबर असे त्याचे नाव आहे. इंद्रायणीनगर येथील स्वामी समर्थ शाळेचा तो संस्थापक व संचालक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर येथे पूजा रेस्टॉरंट ऍण्ड बार आहे. या हॉटेलमध्ये अशोक शेट्टी हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपी बाबर याने 14 ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये येऊन शेट्टी यांना हॉटेलसमोरील गार्डनची जागा वापरायची नाही. ती जागा वापरल्यास तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. तसेच हॉटेल मधील काउंटरजवळ असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर बळजबरीने घेऊन परिसरात दहशत पसरवली. बाबर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पालक सभेत हाणामारी केल्याप्रकरणी बाबर याच्या विरोधात या आधीही भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)