धमकावल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन…

पुणे – कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीनंतर जमाव बंदीचा आदेशाचा भंग करत घराची तोडफोड करून ते जाळल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दोघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सकट कुटुंबीयांना घर सोडून जाण्यासाठी धमकावल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, 21 एप्रिल रोजी पूजा सकट या मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला होता. धमकावल्याप्रकरणामध्ये ज्यांची नावे समोर आली होती, त्या पैकी एक असलेले ऍड. सुधीर ढमढेरे यांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी ऍड. सुधीर शहा यांच्यामार्फत धाव घेतली होती.

-Ads-

विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी त्यांना अटी-शर्थींवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्यात सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)