धमकावणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी – पिस्तूल उगारून धमकावणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ही घटना 19 डिसेंबर रोजी घडली होती.

जयवंत चिंतळकर (वय-30), मदन वसंत वाल्हेकर (वय-28 दोघेही रा. वाल्हेकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. जाधव यांनी फिर्याद दिली.

दौला उर्फ मलक्‍या जब्बार नदाफ याच्या सोबत चिंतळकर व वाल्हेकर यांचे भांडण सुरु होते. यावेळी चिंतळकर याने त्याच्याजवळील पिस्तूल उगारून नदाफ याला धमकावले होते. चिंतोळकर व वाल्हेकर या दोघांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 40 हजार 250 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चिंतळकर हा ड्रायव्हर असून वाल्हेकर हा शेतकरी आहे. त्यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे, मारामारी करणे, बेकायदेशीररित्या जमाव गोळा करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)