धनादेश बाऊन्स प्रकरणी एक महिना कारावास

पुणे – मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलेला धनादेश न वटल्याने एका पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवाला एक महिना कारावास आणि 2 लाख 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. गायकवाड यांनी दिला आहे.
हिमालय नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत लागमण्णा पुजारी आणि सचिव युवराज राम कसबे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. सत्यवान कृष्णाजी जाधव (वय 60, रा. नीलकमल सोसायटी, बाबवेवाडी) यांनी ऍड. सुधीर निरफराके यांच्या मार्फत न्यायालयात खटला दाखल केला होता. जाधव यांनी सांगितल्यानुसार, जाधव यांनी हिमालय नागरी पतसंस्थेत मुदत ठेवीमध्ये पैसे ठेवले होते. मुदत संपल्यानंतर त्याची रक्कम 31 लाख रुपये इतकी झाली. त्यापैकी केवळ 10 लाख रुपयांची रक्कम जाधव यांना मिळाली. उर्वरीत 21 लाख रक्कमेपैकी 2 लाख रक्कमेचा धनादेश देण्यात आला. मात्र, हा धनादेश वटला नाही. या प्रकरणी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी गायकवाड यांनी पुजारी आणि कसबे यांना धनादेश न वटल्या प्रकरणी 1 महिन्याची साधी कैद सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)