धनगर समाजाला अनुसूचित जातीचे दाखले मिळावेत

नायगाव : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना रमेश धायगुडे-पाटील. (छाया : संजय भरगुडे)

माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील यांची मागणी

शिरवळ दि. (प्रतिनिधी) – धनगर आरक्षाणाबाबत त्वरीत निर्णय घेवून धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे दाखले देण्याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना आदेश काढण्यात यावेत, अशा मागणीचे लेखी निवेदन खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
नायगाव (ता. खंडाळा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांच्याकडे निवेदन देवून ही मागणी केली. यावेळी खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीचे जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, माजी सदस्य बापूराव धायगुडे-पाटील, अशोक धायगुडे, म्हस्कूअण्णा शेळक, उत्तमराव धायगुडे, सत्वशील शेळके, अजय धायगुडे-पाटील, दत्तात्रय धायगुडे, बाळासाहेब शेळके, नवनाथ शेळके, शामराव धायगुडे, ऍड.सचिन धायगुडे, संदीप शेळके, लक्ष्मणराव धायगुडे, कुंडलिक ठोंबरे, विक्रम धायगुडे, जिजाबा काळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, चार वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाने रस्त्यावर उतरुन मोर्चे, रास्ता रोको, उपोषणे करुन विविध मार्गांनी आरक्षणासाठी अंदोलनाद्वारे अक्रोश केला.बारामती येथे अंदोलन व उपोषण सुरु असताना उपोषणकर्त्यांना सामोरे जाताना आपण पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्याने धनगर समाजाने आपल्या शब्दाखातर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला भरघोस मतदान करुन समाजाने इमान जपले. तरी आपण धनगर आरक्षणाबाबत त्वरीत निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)