धनगर समाजातर्फे जागरण-गोंधळ घालून शासनाचा निषेध

फलटणमध्ये ठिय्या आंदोलनाचा सातवा दिवस 

फलटण, दि. 4 (प्रतिनिधी) – धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील अधिकार गृह इमारतीसमोर धनगर समाजाच्या अनुसुचित जमात (एस.टी.) आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी धनगर समाज बांधवानी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घालून निषेध केला.
धनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणची त्वरित अंमलबजावणी करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. शनिवारी महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सूळ यांनी धरणे आंदोलनास भेट देवून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी हणमंतराव सूळ म्हणाले, धनगर समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केला. परंतु, तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून-बुजून आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.
धनगर समाज बांधवांचे बेमुदत आंदोलन शहरात गेले सात दिवस सुरू आहे. समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन सूळ यांनी केले.
बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गुलाबराव देवकाते, संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात 93 हजार धनगड असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष जिल्हा व तालुक्‍याची नावे सांगितली जात नाहीत. त्यातच आपल्या जिल्हात धनगड असल्याचे शासकीय स्तरावरून सांगितले जाते. ते नेमके कोठे आहेत ही बाब लपवली जात असल्याचा आरोप धनगर बांधवांनी केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)