धनगर समाजाचे खंडाळ्यात ठिय्या आंदोलन

खंडाळा, दि. 3 (प्रतिनिधी) -धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहीजे. या मागणीसाठी खंडाळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा खंडाळा तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे देण्यात आला.
प्रथम लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मारक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चाला प्रारंभ झाला. धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी खंडाळा तालुक्यातील धनगर कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. खंडाळा तालुक्यातील धनगर समाज आरक्षण कृती समितीचे वतीने लोणंद येथून काढण्यात आलेला मोर्चा खंडाळा गावातुन खंडाळा तहसिल कार्यालयावर पोहोचताच धरणे आंदोलन सुरू केले.
याप्रसंगी यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले , महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी धनगर समाजाचा माणूस बसला तर धनगरांबरोबर मराठयांनाही आरक्षण मिळेल. तसेच खंडाळा येथील शिवाजी चौक , संभाजी चौक, बसस्थानक, मोती चौक बाजारपेठ मार्ग तहसिल कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी धनगर तरुण मोठया संख्येने उपस्थित होते . उपस्थित महीलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव यांना देण्यात आले.
यावेळी खंडाळा येथे या मोर्चात भाजपाचे पुरुषोत्तम जाधव, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, कृषी सभापती मनोज पवार, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, बाळासाहेब बागवान, नगराध्यक्षा लताताई नरुटे, स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्य लक्ष्मण शेळके, माजी सभापती रमेश धायगुडे, अजय धायगुडे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र तांबे, एस. वाय.पवार, अजय भोसले, राजेंद्र नेवसे, नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील, अशोक धायगुडे, चंद्रकांत पाचे, बाळासाहेब शेळके, सत्त्वशील शेळके, भाजपाचे नवनाथ शेळके पाटील, शिवसेनेचे संदीप शेळके पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोहन शेळके पाटील, बबनराव शेळके पाटील, कुंडलिक ठोंबरे, ज्ञानेश्वर धायगुडे आदी खंडाळा तालुक्यातील सर्वपक्षीय धनगर समाज बांधव, नगरसेवक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)