धनगर समाजाचे आंदोलन स्थगित

फलटण, दि. 8 (प्रतिनिधी) – आरक्षणाच्या मागणीवरुन दहा दिवसांपासून प्रांत आणि तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेले धनगर समाजाचे ठिय्या आंदोलन आज बुधवारी अकराव्या दिवशी स्थगित करण्यात आले. महाराष्ट राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीने पुढील काळात राज्यभर एकच आंदोलन करण्याची रूपरेषा ठरवली आहे, त्यानुसार सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे फलटण धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
बुधवार, 8 रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत संतोष जाधव व तहसीलदार विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी भेट देऊन धनगर समाज यांची सरकारकडून अपेक्षित असणाऱ्या आरक्षणाच्या मागणीची माहिती घेतली व दहा दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आज धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात प्रथमता सुरू करण्यात आलेले बेंमुदत ठिय्या आंदोलन स्थगित केले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सरकारला धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी स्थगित करण्यात आले.
दि. 29 जुलै पासून अतिशय शांततेत धनगर समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात धनगर समाज बांधव शेळी मेंढ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जागरण, गोंधळ, गजी नृत्य, ढोल नाद, आशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आले होते. धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगर शब्दामध्ये ‘र’ चा ‘ड’ झालेला असून तो देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे.
पुढील काळात तात्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही. दि 10 ऑगस्ट रोजी पुणे विधानभवन कार्यालयासमोर धनगर समाजातील सर्व आजी माजी आमदाराच्या उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. दि 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयावर शांततेत मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दि 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर दि 8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या सर्व आंदोलनात धनगर समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फलटण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)