धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

बारामती- एनटी नको, एसटी द्या, आशा प्रकारचा एल्गार करत धनगर समाजाने एनटीचे दाखले तहसीलदारांकडे स्वाधीन केले. अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबाजावणी करावी. या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समीतीच्या वतीने बारामती येथे आंदोलन छेडण्यात आले.
शहारातील आहिल्यादेवी चौकात समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. भटक्‍या विमुक्‍त जातीच्या (एनटी) सवलीती समाजाने नाकरल्या. धनगर समाजातील आनेकांनी यावेळी एनटीचे दाखले तहसीलदारांच्या स्वाधीन केले. आरक्षणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरु ठेवणार आहे. आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेतली आहे, असे असले तरी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत मागे हणार नाही. त्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलनाव्दारे वाटेल ती किंमत मोजायला धनगर समाज तयार आहे, अशी प्रतिज्ञा यावेळी समाजबांधवांनी घेतली.
धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी कारावी, अशी धनगर समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. आरक्षण अंमलबजावणीसाठी समाजाने संपूर्ण राज्यात लढा उभारला आहे. 2014 मध्ये बारामती येथे झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले. त्यानंतर आंदोलनाची धार कामी झाली. मात्र, भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी उलटून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाज संतप्त झाला आहे. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून राज्यभरातून आरक्षणाची मागणी होत आहे.
बारामती शहारात धनगर कृती समितीच्या वतीने शनिवारी (दि.4) पुन्हा आंदोलन छेडण्यात आले. शहरातील अहिल्यादेवी चौकात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आंदोलनास सुरुवात केली.
भटक्‍या विमुक्‍त जातीच्या (एनटी)सवलती नको. आम्हाला अनुसुचित जमातीच्या (एसटी) सवलती लागू करा, आशी मागणी यावेळी करण्यात आली. घटनेने दिलेल्या एसटीच्या सवलतींची अंमलबजावणी करा, असे सांगत शेकडो कार्यकर्त्यांनी एनटीची दाखले शासनाच्या स्वाधीन केले.
यावेळी मोठ्या संख्यने धनगर बांधव एकत्र आले होते. कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन केले होते. ऍड रमेश कोकरे, मदन देवकाते, किशोर मासाळ, गोविंद देवकाते, निलेश धालपे, संपत टकले तसेच कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी सरकारला धारेवर धरत आरक्षणाची जोरदार मागणी केली. ऍड जी.बी गावडे, नगरसेविका निलीमा मलगुंडे, कमल कोकरे, मंदाकिनी घुले, संजय देवकाते, सनी देवकाते, ऍड. अमोल सातकर, मंगेश मासाळ, रामेश देवकाते, अविनाश भिसे, जगदिश कोळेकर, नवनाथ मलगुंडे, शेखर हुलगे, सतीश कोकरे, सचिन गडदे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

  • धनगड आणि धनगर हे एकच
    धनगड आणि धनगर एकच असल्याचे सांगत समाजातील कार्यर्त्यांनी यावेळी शासनाला धारेवर धरले. धनगड समाज महाराष्ट्रात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबातचे सर्व पुरावे समाजाच्या हाती आले आहेत. बारामती तालुक्‍यात धनगड समाजाचे एकही कुटूंब नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. संपूर्ण राज्यात हिच परिस्थिती आहे. त्यामुळे धनगड दाखवा अन्यथा धनगरांना अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कारण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
  • पुण्यात आज राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन
    धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रविवारी (दि.5) पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील धनगर समाजतील नेतेमंडळी तसेच आमदार, खासदार या मेळाव्यास उपस्थित राहाणार आहेत. आरक्षणच्या मागणी संदर्भातील पुढील दिशा यावेळी स्पष्ट होणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)