धनगर समाजाकडून पोलीस प्रशासनाला निवेदन

शेवगाव – न्यू आर्टस महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण श्रीधर मतकर यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेला अँट्रासिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. योग्य कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदन कर्त्यांनी दिला.

याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राचार्य. मतकर यांच्यामुळे महाविदयालयाला पुणे विदयापीठाचा उत्कृष्ट ग्रामीण महाविदयालायाच पुरस्कार मिळाला. तसेच महाविद्यालयास नॅंकची अ श्रेणी मिळुन दिली. त्याच प्रमाणे एन. एस. एसचा बेस्ट युनिट पुरस्कार मिळाला. महाविद्यालयात गुंडगिरी करणाऱ्यांना थारा दिला नाही. म्हणून दुखावलेल्या समाजकंटकांनी फिर्यादीस हाताशी धरुन शेवगावचे वातावरण बिघडवण्याचा व जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजीची त्याला किनार आहे. प्राचार्य मतकर यांच्यासारखा उच्चशिक्षीत व अल्पसंख्यांक समाजातील माणूस कधीही जातीवाचक शब्द वापरु शकत नाही असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन कर्तेम्हनाले की, या खोट्या गुन्हयाची चौकशी करुन गुन्ह्यातील तथ्य तपासावे. मतकर यांना बळीचा बकरा केले जात आहे. मतकराविरूद्ध षडयंत्र रचुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असुन, पोलीसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर आठ दिवसात संपुर्ण राज्यात आंदोलन करु असा इशारा रासपचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्‍वरचे माजी संचालक निवृत्ती दातीर, कम्युनिष्ठचे बापुसाहेब राशिनकर, रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, पाचेगावचे सरपंच दिलीप पवार यांनी दिला.

यावेळी शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी निवेदन स्विकारले. या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली जाईल कोणावरही अन्याय होणार नाही. कायद्याचा दुरुपयोग केला जाणार नाही असे आश्‍वासन शिवथरे व सपकाळे यांनी निवेदन कर्त्यांना दिले. यावेळी नगरसेवक अशोक आहुजा, विकास फलके, भाऊसाहेब कोल्हे, गणेश कोरडे, अमोल मिसाळ, खादी ग्रामउदयोग संघाचे आबासाहेब मिसाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक शहादेव खोसे, भाऊसाहेब डुकरे, रवींद्र घुगरे, गोरक्षनाथ कर्डीले, कारभारी वीर, गोपीनाथ चोरमारे यांच्यासह तालुक्‍यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)