धनगर तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या

पिरंगुट- चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीमध्ये धनगर समाजासाठी आरक्षण मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या तरूणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन डोंगरे यांना दिले आहे.
सत्ता आल्यावर धनगर समाजाला मंत्रीमंडळाच्या पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे दिले होते. परंतु चार वर्षे उलटून गेली तरी आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे चौंडीतील अहिल्यादेवींच्या जयंती उत्सवात तरूणांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे त्यांनी आवाज उठवला. सरकारने तरूणांच्या भावना समजून घेऊन त्यांना न्याय द्यायला पाहिजे होता. परंतु उलट या तरुणांवर गुन्हे दाखल करून धनगर समाजावर अन्याय केलेला आहे. हा अन्याय दूर करून तातडीने तरूणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील, असा इशारा या निवेदनाद्वारे शासनाला दिलेला आहे. यावेळी सभापती कोमल साखरे, सुभाष अमराळे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती महादेव कोंढरे, कोमल वाशिवले, ओबीसी सेलचे अध्यक्ष काळुराम आखाडे, युवक अध्यक्ष अमित कंधारे, माजी सभापती महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सुनील वाडकर, योगेश ठोंबरे, विलास अमराळे, नवनाथ चरवड, दत्ता धिडे, प्रविण धनवे, संदीप नाकती, विशाल घारे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)