धनगर आरक्षण प्रश्‍नाला आज “फोडणी’? सर्वच राजकीय पक्षाचे मंत्री, आमदार एकाच व्यासपीठावर

बाबीर यात्रा महोत्सावात समाज एकवटणार : सर्वच राजकीय पक्षाचे मंत्री, आमदार एकाच व्यासपीठावर

रेडा: राज्यातील व राज्याबाहेरील धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले इंदापूर तालुक्‍यातील रुई येथील बाबीरगड देवस्थान येथे बाबीर यात्रा महोत्सवात यंदा मोठ्या ताकदीने राज्यातील धनगर समाज एकवटणार आहे. गजढोल नृत्य स्पर्धा, धनगर समाजाचा महामेळावा शुक्रवारी (दि. 9) अनेक दिग्गजांच्या उपस्थित रंगणार असल्याने, धनगर आरक्षणाचा प्रश्‍नाला सरकारला घाम फोडणारा रेटा निर्माण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनगर समाजाचे देवस्थान बाबीरच्या मुख्य मंदिरावर आकाशातून हेलिकॉप्टरच्या सहायाने पुष्पवृष्टी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर करणार आहेत. यावेळी होणाऱ्या धनगर समाजाच्या महामेळावास मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार दत्तात्रय भरणे, नारायण पाटील, बाळासाहेब मुरकुटे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

धनगर समाजाचे नेते आमदार व मंत्री सालाबादप्रमाणे या देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे यंदा धनगर आरक्षणाची सरकारने लावलेली चेष्टा या संदर्भात एकत्र येवून सरकारला काय अल्टीमेट दिला जातोय याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बाबीर गडावरून काय आरक्षणासाठी फर्मान निघणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)