धनगर आरक्षण, टिसच्या अहवालाबाबतही सरकारने स्पष्ट करावे- अजित पवार

मुंबई: मराठा समाज गेल्या वर्षभरापासून शांत मोर्चे काढत आहेत. या मोर्चांना कधीही गालबोट लागले नाही. मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कालपासून मराठा समाजाच्या तरुणांची धरपकड सुरू आहे. या अटकसत्रातील गुन्हे अजूनही मागे घेतले गेलेले नाहीत, याबाबत सभागृहात बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

सभागृह सुरू आहे तेव्हाच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही विधेयक आणावे. धनगर आरक्षणाबाबत टिसच्या अहवालाबाबतही सरकारने स्पष्ट करावे. आम्हालाही त्या अहवालाचा अभ्यास करू द्या. तोही अहवाल सरकारने सभागृहात मांडावा, अशीही मागणी अजित पवार यांनी केली.

-Ads-

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले याआधीही आरक्षणाबाबत अनेक अहवाल आले आहेत. पण ते कधी सादर झाले नाहीत. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात काय आहे याची सरकारने सभागृहाला माहिती द्यावी. हा अहवाल का सादर केला जात नाही. काही लपवले जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणतात मराठा आरक्षणात अडथळा आणला जात आहे. अडथळा कोणीही आणत नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)