धनगर आरक्षणासाठी पंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या गेटवर अडवलं

  • आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू”
  • धनगर आरक्षणासाठी रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडेंना अडवलं

मुंबई: धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवली. पंकजा मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या. आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू, अशी प्रतिक्रिया रामराव वडकुते यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी स्वतः स्टेटमेंट केले होते की धनगर आरक्षण देईपर्यंत मंत्रालयात जाणार नाही. पण आज त्या मंत्रालयात हजर होत्या. सरकारमधील मंत्री बोलतात एक आणि करतात एक. मुख्यमंत्रीही म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो आज ४५० कॅबिनेट झाल्या तरी अजूनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही असा संताप वडकुते यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप धनगर समाजाच्या जोरावर सत्तेत आले पण त्यांना आता धनगरांचा विसर पडला आहे. हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. उच्चवर्णीय समाजाला सरकार १० टक्के आरक्षण देते मग धनगर समाजाला का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)