धनगर आरक्षणासाठी दिल्लीत प्रयत्न करणार

फलटण : ठिय्या आंदोलनस्थळी धनगर समाबांधवांना मार्गदर्शन करताना ना. रामराजे नाईक-निंबाळकर.

ना. रामराजे : धनगड शब्दातून झालेली चूक दुरुस्त करण्याची गरज

फलटण, दि. 3 (प्रतिनिधी) – धनगर आणि धनगड या शब्दाची गल्लत झाल्याने शासनाने काढलेला अर्थ सुधारण्यासाठी दबावगट करुन शासनाला या प्रश्‍नी धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे. न्यायालयाच्या माध्यमातून ही चूक दुरुस्त केली पाहिजे, अशी अपेक्षा विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रश्‍नासाठी प्रसंगी दिल्ली येथे जावून प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
फलटण येथे अधिकार गृहासमोर धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून गेली 5 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. याठिकाणी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. ना. रामराजे म्हणाले, घटनेतील धनगर आणि धनगड या शब्दाचा अर्थ लावताना झालेली गडबड दुरुस्त करण्यासाठी दिल्ली सरकारकडे राज्य शासनाने योग्य शिफारस करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील असून गरज पडली तर दिल्लीत जावूनही हा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपणही निश्‍चितपणे प्रयत्न करणार आहोत. तथापि, धनगर समाजाने संयमाने आणि शांततेने आंदोलन करावे, असे आवाहन ना. रामराजे यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाचे एसटीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, तथापी तोपर्यंत शासनाने जे देवू केले आहे ते पदरात पाडून घेण्याचीही आवश्‍यकता आहे. धनगर आरक्षणप्रश्‍नी अभ्यास करणारे प्रा. चिंगळे यांच्याशीही आपण सविस्तर चर्चा केली असून हा प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी स्वागत केले. बजरंग खटके यांनी मनोगत व्यक्त केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)