धनगर आरक्षणसाठी भिगवण आज बंद नाही

भिगवण- धनगर आरक्षणाच्या आंदोलनाच्या मागणीसाठी सोमवारी (दि. 13) पुकारण्यात आलेला बंद होणार नाही, असे भिगवण ग्रामस्थांनी सर्वानुमते मान्य केले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांची असते त्यासाठी आपण सर्वानीच प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीळकंठ राठोड यांनी केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंद असणार आहे, त्याबरोबर भिगवण शहरदेखील बंद राहणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत होत्या, त्यामुळे धनगर समाज बांधवांची पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेण्यात आली, त्यावेळी राठोड यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, रामहरी चोपडे, तानाजी पाटील, कुंडलीक बंडगर, तेजस देवकाते, तुषार झेंडे, महेश शेंडगे, अण्णा धवडे, पोलीस पाटील तनुजा कुताळ आदी उपस्थित होते.
नीळकंठ राठोड म्हणाले की, भिगवणमध्ये अनेकवेळा बंद होत असतो त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांचे हाल होतात आंदोलनासरख्या गोष्टींमुळे समाजातील युवकांवर गुन्हे दाखल होतात, यामुळे अनेकदा युवकांचे करिअर अडचणीत येते. त्यामुळे धनगर समाजाच्यावतीने भिगवण बंद न ठेवण्याचा निर्णय स्तुत्य आहे, असे त्यांनी नमूद केले. महेश देवकाते म्हणाले की, आरक्षणाची मागणी ही जुनी असून ती मांडण्यासाठी आपण कायद्याच्या मार्गाने लढले पाहीजे. तर हनुमंत बंडगर यांनी देखील बंद शिवाय दुसऱ्या सनदशीर मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असे नमूद केले. तर मदनवाडी बंद तर कधीही होवू नये यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करणार असल्याचे धनाजी थोरात यांनी सांगितले

  •  धनगर आरक्षणाबाबतचे निवेदन देणार
    शासनाने गेल्या 50 वर्षांपासून धनगर समाजाला एस. टी (अनुसूचित जमाती) सवलतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत सोमवारी (दि. 13) भिगवण येथे धनगर समाज बांधवांच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सोपवणार असल्याचे धनगर समाज बांधवांनी स्पष्ट केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)