धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही : पंकजा मुंडे

नांदेड: धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण मंत्रालयात प्रवेश करणार नाही, असे राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते.

धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, असे वचन आपण धनगर समाजाला देत असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनगर आरक्षणासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिली. धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर त्याचा समाचारही घ्यायची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)