धनगरवाडीजवळ केमिकल टॅंकर पेटला

जीवितहानी नाही : अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात

शिरवळ – धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्गावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सेवा रस्त्यावर केमिकलने भरलेला टॅंकर होवून आग लागून टॅंकर भस्मसात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्यात यश आले आहे. गुजरात येथून स्थेरिंग मोनोमल हे केमिकलने भरलेला टॅंकर (जीजे- 12- बीव्ही-2682) हा धनगरवाडी येथील एमआयडीसीतील कंपनीमध्ये जात होता.

दरम्यान, टॅंकर धनगरवाडी गावच्या हद्दीत आला असता आशियाई महामार्गावरील पुणेहुन सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नजीकच्या सेवा रस्त्यावर अचानकपणे पलटी झाला. यावेळी टॅंकरमधील केमिकल सांडल्याने टॅंकरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यावेळी टॅंकरचालककाने व क्‍लिनरने प्रसंगावधान दाखवत तातडीने टॅंकरमधून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्याची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, हवालदार धिरज यादव, अविनाश डेरे, विकास इंगवले, विकास देवकर, दिग्विजय पोळ यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने एशिअन पेन्ट्‌स येथील अग्निशमन दलाला पाचारण करत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. वाहतुकीची वर्दळ नसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.

पाचगणी, भोर, फलटण, एशिअन पेन्ट्‌स कंपनीच्या अग्निशमन दलाने चार तास अथक परिश्रम घेत आग आटोक्‍यात आणली. यावेळी आग आटोक्‍यात आणल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने जळालेला टॅंकर बाजूला काढण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून तपास हवालदार धीरज यादव करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)