धनगड म्हणजे धनगर का?

सरकारचे विचार मंथन

धनगर आरक्षणासाठी हालचाली 

मुंबई – राज्यातील धनगर समाजासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेने तयार केलेला अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालाचा राज्य सरकार सकारात्मक विचार करीत असून धनगड म्हणजेच धनगर का? या संदर्भात विचार मंथन सुरू आहे, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.

धनगर समाजाला एनटी ऐवजी एसटी अनुसुचित जमातीत समावेश करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी राज्य सरकारकडून ही माहिती न्यायालयात देताना धनगर समाजाला भटक्‍या जमातीचे (एनटी) आरक्षण नको, तर त्यांचा समावेश अनुसुचित जमातीत (एसटी) आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका प्रलंबित असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. या दोन्ही याचिकांवर एकत्रीत सुनावणी घेण्याची विनंती केली. सरकारची मागणी मान्य करत न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)