धनकवडी, बालाजीनगरमध्ये कचऱ्याचे ढीग अन्‌ डुकरांचा सुळसुळाट

कात्रज – धनकवडी, बालाजीनगर येथील पुनम गार्डन रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग व डुकरांचे सुळसुळाट निदर्शनास येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर, नागरिकांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे.

या रस्त्यावर इमारतीच्या गेटसमोर नागरिकांनी टाकलेला कचरा व त्या कचऱ्यावर वावरत असलेली डुकरे पाहणे, नित्याचेच झाले आहे. शहरात एकीकडे स्वच्छता अभियान जोरात सुरू असताना दुसरीकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या समस्येवर नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. शिवाय मोकाट डुकरे रस्त्यावर आडवी-तिडवी पळत असल्यामुळे वाहनचालकांचा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यामध्ये आंबेगाव पठार येथे 39 येथील 39 डुकरे पकडून पिगरी फॉर्मला पाठवण्यात आली होती, अशीच मोकाट डुकरे के.के.मार्केट रोड, बालाजीनगर, व आंबेगाव पठार येथे अजूनही रस्त्यावर वावरताना दिसतात. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन कचऱ्याचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)