धनकवडी जिल्हा परिषद शाळा डिजीटलयुक्‍त

काळदरी- ग्रामपंचायत धनकवडीमार्फत 14 व्या वित्त आयोग अंतर्गत डिजिटल स्कूलसाठी जिल्हा परिषद प्राशमिक शाळा धनकवडीसाठी स्मार्ट टीव्ही आणि इयत्ता 1 ली ते 4 थी करिता संपूर्ण अभ्यासक्रम देण्यात आला. याप्रसंगी शाळेतील डिजीटल स्कूलचे उद्‌घाटन सरपंच सुमन खोमणे व उपसरपंच उमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजीटल स्कूलमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असून दैनंदिन अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढणार असल्याचे मुख्याध्यापक सुनील गाडे यांनी सांगितले. केंद्र प्रमुख प्रभावती कोठावळे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक करून डिजीटल स्कूलसाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. ग्रामस्थांनी शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. शाळेच्या सुविधा वाढविण्यासाठी लोकवर्गणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दिपक गिरी यांनी सूत्रसंचालन केले. शाळेतील विविध उपक्रमांची चलचित्रफित दाखवली नंतर सुनील गाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)