उस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का

घड्याळ घातलेल्या हातांची मदत…
स्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्ही घ्यावे, असे सुरेश धस म्हणाले. या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असे विचारले असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली, असे त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल जाहीर
सुरेश धस यांचा 76 मतांनी विजय

उस्मानाबाद – उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर 25 मतं बाद ठरली. दरम्यान, सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाल्याने अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)