धक्कादायक! स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या

गुरुग्राम: स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्या पत्नीची पतीने गळा दाबून हत्या केली आहे. पत्नी दिवसरात्र फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरत असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली पतीने पोलिसांकडे दिली. या प्रकरणी पती पोलिसांच्या अटकेत आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली.

पती हरिओमने गुन्ह्याची कबुली देताना पत्नी लक्ष्मीच्या स्मार्टफोनच्या अति वापराचा वारंवार उल्लेख केला. ‘पत्नीच्या बेसुमार स्मार्टफोन वापराला मी कंटाळलो होतो. ती सतत मोबाईल वापरत राहायची. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर तिचे अखंडपणे चॅटिंग सुरू असायचे. या नादात तिचे कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. ती मला, मुलाला जवळपास विसरुनच गेली होती. आई, पत्नी म्हणून ती कधीच घरात लक्ष देत नव्हती,’ असे 35 वर्षांच्या हरिओमने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितले.

हरिओमने गुरुग्राममधील त्याच्या घरात पत्नी लक्ष्मीची हत्या केली. रात्री लक्ष्मी झोपली असताना हरिओमने तिचा गळा दाबला. सकाळी लक्ष्मीचे वडिल बलवंत सिंग मुलीला भेटायला तिच्या घरी आले. तेव्हा त्यांना बेडवर लक्ष्मीचा मृतदेह आढळून आला. यावेळी हरिओम लक्ष्मीच्या मृतदेहाजवळच बसून होता. यानंतर बलवंत सिंग यांनी पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हरिओमला पोलिसांनी महानगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)