धक्कादायक ! विमान हवेत असतानाच वैमानिकाला आला हार्ट अटॅक

कोलकाता : इन्फाळहून कोलकात्याला येणा-या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला. विमान हवेत असतानाच वैमानिकाला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यातही त्यांनी प्रसंगावधान दाखवत विमानाचे कोलकातातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडिंग केले. ही घटना शनिवारी घडली होती.

63 वर्षीय वैमानिक सिल्वियो डियाज अकोस्टा कोलकात्यात विमानाचे लँडिंग करत असतानाच त्यांच्या छातीत जोरात दुखू लागले आणि ते घामाघूम झाले. सिल्वियो यांनी याची तक्रार सहकारी वैमानिकाकडेही केली. अशातच त्या मुख्य वैमानिकानं सहकारी वैमानिकाला सांभाळत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले. त्यानंतर एअरपोर्ट मेडिकल युनिटमध्ये त्यांना पाठवण्यात आले. तिथे ईजीसी केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉक्टरांच्या माहितीनुसार, अकोस्टा यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांनी जे केले कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही ज्या धैर्याने अकोस्टा यांनी विमानाचे लँडिंग केले, ते एखाद्या चमत्कारासारखंच आहे. वैमानिक अकोस्टा सुरक्षित आहेत, सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)