धक्कादायक ! बिहारमध्ये नराधमांनी भर रस्त्यात फाडले मुलीचे कपडे

पाटणा: कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता बिहारमध्ये भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या जेहनाबाद येथे शनिवारी ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार नराधमांनी एका तरूणीला घेरलेले दिसत आहे. हे नराधम तरूणीच्या अंगावरील कपडे फाडत असून निर्लज्जपणे या प्रकाराचे शुटिंग करत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन जणांचे चेहरे व्हिडीओतील तरूणांशी मिळतेजुळते आहेत तर अन्य दोन जण या घटनेचे शुटिंग करत होते. या चौघांकडून अन्य काही जणांची नावे कळाली आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी अन्य आरोपींना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतल्याची माहिती पाटण्याच्या विभागीय पोलीस महानिरीक्षकांकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)