धक्कादायक…! पाकिस्तानमध्ये 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने
मुस्लिमांमध्ये धर्मांतर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

एका वृत्तपत्राने या विषयी माहिती दिली आहे. ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या पदाधिका-यांनी मातली जिल्ह्यातील जवळपास 50 कुटुंबीयांतील 500 लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भारतात स्थानिक होण्यासाठी आले लोक होते. मात्र, त्यांना लॉन्ग टर्म व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तान गेले होते.

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर, येथील हिंदूंची अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे, ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेक संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)