धक्कादायक…! पतीने पत्नीच्या शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले

मेक्सिको: मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीने त्याच्या आधीच्या पत्नीचे तुकडे करून शिजवून खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच तिच्या शरीराच्या उरलेल्या अवशेषांना त्याने प्लास्टिकच्या बॅगेत लपवून ठेवले होते. महिला अचानक गायब झाल्याने तिचे घरचे विचारात पडले होते.त्यावरून हे प्रकरण समोर आले.

22 जानेवारी रोजी महिलेच्या नवऱ्याच्या घरातून माग्दालेना अगिलार रोमेरोच्या मृतदेहाचे अवशेष स्टोववर ठेवलेल्या भांड्यात सापडले. महिलेच्या शवाचे अवशेष पाहून तिच्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. देशाच्या दक्षिण भागात ही घटना घडली आहे. डेली मेलने हे वृत्त दिले आहे.  माग्दालेना सहपरिवारसह राहत होती. त्यांना दोन मुलेही होती. पोलिसांच्या मते, मृत महिलेचा पूर्व पती सीजर लोपेज आर्सिनीगी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपीने प्लास्टिकच्या बॅगेत शवाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. स्टेट सिक्युरिटीचे प्रवक्ते रॉबर्टो अल्वारेज यांच्या माहितीनुसार, मृतदेहाकडे पाहून त्यांला शिजवले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत असून महिलेची हत्या का करण्यात आली, याबद्दलची माहिती समजलेली नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)