धक्कादायक! नोंदणी दुचाकीची, क्रमांकाचा वापर चारचाकीसाठी

महापालिकेने जप्त केलेल्या वाहनांचे वास्तव

पुणे- दुचाकी म्हणून नोंदणी केलेल्या तब्बल 41 वाहनांचे क्रमांक चक्क चारचाकी वाहनांना वापरून ही वाहने वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 41 चारचाकी वाहनांचा दुचाकी म्हणून नोंदणी असलेले नंबर प्लेट वापरल्याचे समोर आल्याची माहिती महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरातील रस्त्यांवर वर्षानुवर्षे पडलेली तब्बल 690 नादुरूस्त वाहने महापालिकेने जप्त केली. त्यांची नोंदणी तपासणीसाठी पालिकेने ही माहिती आरटीओला पाठवली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही वाहने गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आल्याची दाट शक्‍यता आहे. पालिका प्रशासनाने जप्त केलेल्या 690 वाहतांमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, सहाचाकी तसेच दहाचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यात काही वाहने ही परराज्यांतील नोंदणीची आहेत.

-Ads-

या सर्व वाहनांचे मालक तसेच त्यांच्या नोंदणी क्रमांकाची खात्री करून घेण्याचे तसेच ही वाहने गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आली आहेत का, याची तपासणी आरटीओ तसेच पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, आता हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालिकेची मात्र अडचण झाली आहे.

..तर लिलाव थांबणार
महापालिका प्रशासनाने या वाहनांचा लिलाव 5 मे रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा प्रकारे बोगस नंबर प्लेट असलेली ही वाहने सापडल्याने ही वाहने चोरीची अथवा गुन्ह्यांत वापरली असण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या वाहनांचे पोलीस तपासात असणारे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)