#धक्कादायक: ननचा बिशपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

कोट्टायम, येथील एका ख्रिश्‍चन ननने आपल्याच धर्माच्या एका ज्येष्ठ धर्मगुरूवर बलात्काराचा आरोप केला आहे. रोमन कॅथॉलिक बिशपने आपल्यावर अनेक वेळा डांबुन ठेऊन बलात्कार केला असे तिचे म्हणणे आहे. या प्रकरणी आपण त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करून न्यायालयीन लढाही देणार आहोत असे तिने म्हटले आहे.

चार वर्षांपुर्वीपासून आपल्याला हा त्रास सहन करावा लागला आहे. या प्रकरणी चर्चच्या अन्य ज्येष्ठांकडे आपण तक्रार केली पण त्याचा काहींही उपयोग झाला नाहीं त्यामुळे आपण आता त्यांच्या विरोधात पोलिस कारवाईचा आग्रह धरणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. जालंधर डायोसिस नावाच्या चर्चच्या बिशपने आपल्याला कोट्टायम जिल्ह्यातील एका छोट्या गावात चार वर्षापुर्वी बलात्कार केला. त्यांनी तेथे किमान तेरा वेळा आपला लैंगिक छळ केला असे तिचे म्हणणे आहे. या प्रकरणी चर्चच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीच कारवाई न केल्यानेच आपल्याला पोलिसांत जाणे भाग पडले असे तिने म्हटले आहे. दरम्यान बिशप यांच्या समर्थकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तिच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी पोलिसांनी उपअधिक्षक दर्जाचा अधिकारी नेमला आहे. हे बिशप तेथील चर्च मध्ये सन 2013 पासून बिशप म्हणून कार्यरत आहेत. चर्चच्या अधिकाऱ्यांनी या ननच्या नातेवाईकांच्या विरोधातही पोलिसांत तक्रार दिली असून ननच्या नातेवाईकांनी बिशप यांना धमकावले असल्याचे त्यात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)