धक्कादायक ! दिल्लीत चुलत भावाकडून ८ महिन्याच्या बहिणीवर बलात्कार

नई दिल्ली : राजधानी दिल्लीत क्रूरकृत्याची परिसीमा गाठल्याची घटना उघड झाली आहे. दिल्लीच्या शकूरबस्ती परिसरात आठ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या चुलत भावाला सोमवारी रात्री उशिरा अटक केली.
हे प्रकरण रविवारचे आहे. चिमुकलीची आई रविवारी रात्री कामावरुन घरी परतल्यानंतर तिला या घटनेबाबत समजले. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात असून ती व्हेटिंलेटरवर आहे. मुलीचे कुटुंब शकूरपूर वस्तीत राहते. वडील मजुरी करतात तर आई इतरांच्या घरात धुण्या-भांड्यांचे काम करते. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची आई रविवारी सकाळी तिला नातेवाईकांकडे ठेवून कामाला गेली. काही वेळाने मुलीचे वडीलही कामासाठी निघाले. संध्याकाळी आई कामावरुन परतली असता, मुलगी रडत होती, आणि तिच्या गुप्तांगांमधून रक्तस्राव सुरु होता.
मुलीची आई तिला आरोपीच्या आईकडे ठेवून कामाला गेली होती. तिच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने आरोपी तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने चिमुकलीचे तोंड दाबून ठेवले होते, जेणेकरुन तिच्या रडण्याचा-ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, असेही पोलिस म्हणाले. लैंगिक अत्याचाराबाबत पोलिसांनी केलेल्य प्राथमिक चौकशी आरोपीने गुन्हा दाखल केले नाही आणि त्यानंतर तो पसार झाला. यामुळे पोलासांचा संशय बळावला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)