धक्कादायक! दारु विक्रीसाठी रुग्णवाहिकेचा वापर

अहमदाबाद : दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात महागडी दारू पोहोचण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानहून अहमदाबादला नियमित दारू पोहोचवत असताना पोलिसांनी याचा भांडापोड केला.

भारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL) नियमितपणे राजस्थान ते अहमदाबाद पोहोचवली जात असे. दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात दारू पोहोचण्यासाठी कोणाला संशय येऊ नये तसेच चेकनाक्यावर तपासणी होऊ नये यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत होता. अहमदाबादमधील महादेव इस्टेट या ठिकाणी रुग्णवाहिकेतील दारू रिक्षात नेत असताना पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. तर रुग्णवाहिकेचा चालक फरार झाला.

रुग्णवाहिकेत १,६५० दारुच्या बाटल्या मिळाल्या आहेत. या दारुची बाजारभावानुसार दीड लाख रुपये इतकी किंमत आहे. याप्रकरणी रिक्षाचालक खेमराज राठोड (वय१९) याला पोलिसांनी अटक केली. रुग्णवाहिकेच्या चालकाचं दीपक राठोड असं नाव असून तो आठवड्यातून दोनदा रुग्णवाहिकेतून दारू अहमदाबादमध्ये आणायचा, अशी माहिती आरोपी खेमराज राठोड याने पोलिसांना दिली.

गेल्या वर्षभरापासून दीपक राठोड हा दारु विक्री करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करायचा अशी माहिती मिळाली आहे. त्यानं या वर्षभरात किती दारू अहमदाबादमध्ये आणली आहे, याची माहिती दीपक राठोडला अटक केल्यानंतरच मिळू शकेल, असं पोलिसांनी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)