#धक्कादायक: झारखंडमध्ये दोन मुलींनी मागितली मदत, तर 11 जणांनी केला बलात्कार

रांची (झारखंड): मदत मागणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांनी बलात्कार केल्याची घटना लोहरडागा जिल्ह्यातील हिरही हर्रा तोली भागात घडली आहे. पोलीसांनी या अकराही बलात्काऱ्यांना अटक केल्याची माहिती डीएसपी आशीष कुमार माहली यांनी दिली आहे. हे अकरा जण 18 ते 28 या वयोगटातील आहेत.

16 ऑगस्ट रोजी या दोन मुली आपल्या शेजाऱ्यांबरोबर बाईकवरून जात असताना हिरही रेल्वे पुलाजवळ त्यांची बाईक बंद पडली. त्यांनी आपल्या एका मित्राला फोन करून त्याची मदत मागितली. मित्राने स्वत: येण्याऐवजी आपल्या 11 मित्रांना त्यांनी सांगितलेल्या जागी पाठवले. मुलींबरोबर असलेल्या त्यांच्या शेजाऱ्याला या अकरा जणांनी मारहाण करून हाकलून दिले आणि या दोघींना एकांत जागी नेऊन त्यांच्यावर सर्वांनी बलात्कार केला.त्यांचे मोबाईल काढून घेतले, आणि ते निघून गेले.

पोलीसांनी सर्वच्या सर्व अकरा आरोपींना अटक केली असून त्यांच्यापैकी एकाच्या घरातून त्याने पळवलेले मुलींचे मोबाईल जप्त केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपीडीओ अरविंद कुमार आणि डीएसपी माहली यांच्या नेतृत्वाखालील पोलीस टीमने या प्रकरणाचा तपास केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)