धक्कादायक ! गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त देण्यात आलं

तामिळनाडू : गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवल्यानं तामिळनाडूमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमधील शिवकाशीतल्या सत्तुर सरकारी रुग्णालयात घडला आहे.
रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला HIV संक्रमित रक्त चढवण्यात आलं. जेव्हा ही महिला वारंवार आजरी पडू लागली, तेव्हा ही घटना सर्वांच्या समोर आली. त्या नंतर रुग्णालय प्रशासनाकडून ब्लड बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे.
या सर्व प्रकारानंतर जिल्हा वैद्यकीय उपसंचालक मनोहरन यांनी 10 सरकारी ब्लड बँक आणि 4 खासगी ब्लड बँकेच्या चौकशीचे आदेश दिले असून , रुग्णालय प्रशासन या घटनेचा तपास करत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)