धक्कादायक: गर्भपाताला नकार दिल्याने महिलेला पेट्रोल टाकून जाळले

नाशिक:  गर्भपाताला नकार दिला म्हणून एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी  महिलेचा पती, दीर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून हे तिन्ही आरोपी फरार आहेत.

नाशिकच्या सटाणामध्ये काल मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. रुपाली कुमावत असे या पीडित महिलेचे नाव आहे. रुपाली पाच महिन्यांची गर्भवती होती. पती विलास कुमावत याने रुपालीला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्याने विलासने भाऊ योगेश कुमावतच्या साथीने रुपालीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात रुपाली ५५ टक्के भाजली. रुपालीची आई जवळच राहतात. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुपालीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुपालीवर तिथे उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सटाणा पोलिसांनी रुपालीचा पती विलास कुमावत याच्यासह दीर आणि सासऱ्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि रुपालीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)