धक्कादायक! गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली!

अहमदनगर अहमदनगरला गणित चुकल्यानं 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक समोर आली आहे. रोहन जंजीरे असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो दुसरी इयत्तेत शिकतो आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. चंद्रकांत शिंदे असे या मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना, दहा तारखेला सकाळी अकरा वाजता दुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकाने मारहाण केली.

शिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे. रोहनला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी रोहनच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)