धक्कादायक ! कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्यालयच अनधिकृत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील तीन इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने नेमलेल्या समितीने याबाबतचा अहवाल दिला आहे. या अहवालातील माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.

कल्याणच्या शिवाजी चौकात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात प्रशासकीय भवन आणि महापालिका भवनाच्या इमारती आहेत. या इमारतींना लागूनच अत्रे रंगमंदिर आणि झुंजारराव व्यापारी संकुल आहे. या तिन्ही इमारती खेळाचं मैदान आणि स्टेडियमच्या आरक्षित जमिनीवर बांधण्यात आल्या आहेत. शिवाय आरक्षित भूखंडावर इमारती बांधताना त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी शासनाकडून घेण्यात आलेली नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबतच्या चौकशीसाठी शासनाने २००७ साली अग्यारी समितीची स्थापना केली होती. या समितीने २००९ साली शासनाला सादर केलेल्या अहवालात महापालिकेच्या इमारती अनधिकृत असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि विवेक कानडे यांनी या अहवालाची प्रत समोर आणली आहे.

एकीकडे अनधिकृत बांधकामे वाचवताना केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त लाचखोरीच्या प्रकरणात अडकतात. तर दुसरीकडे केडीएमसीची इमारतच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. आता याप्रकरणी दोषी असलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)