धक्कादायक ! उड्डाण पुलावरील कठड्यावर पोलिसाचा गळफास

सोलापूरसोलापुरात एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यांनी उड्डाण पुलावरील कठड्यावरील लोखंडी अँगलला गळफास आत्महत्या केली आहे. मारुती राजमाने असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मारुती राजमाने यांनी शेळगी उड्डाण पुलावर आत्महत्या केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरात पोलीस दलातर्फे चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावर त्यांची नियुक्ती होती. रविवारी पेट्रोल पंपावरची 5 लाखांची रोकड पोलीस मुख्यालयात नेताना ती चोरट्यांनी पळवली होती. मारुती यांना चोरट्यांनी मारहाणही केली होती. या चोरीप्रकरणी पोलिसांचा संशय मारुती यांच्यावरच होता. त्यामुळे ते खूप तणावात होते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. बदनामीच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)