धक्कादायक!वसुली पथकासमोरच मायलेकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी कुटुंबातील मायलेकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमधील पांढुर्ली गावातील शेतकरी कुटुंबाने बँकेच्या अन्यायकारक वसुली मोहिमेविरोधात हे पाऊल उचलल्यामुळे ही अन्यायकारक वसुली मोहिम थांबवण्याची मागणी होत आहे.

कैलास मुकुंद वाजे आणि त्यांची आई सुलोचना मुकुंद वाजे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मायलेकांचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या देवळाली कॅम्प परिसरातील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 2006 मध्ये त्यांनी सहा लाख रुपये कर्ज घेतले, त्यानंतर कायमच नापिकी, अस्मानी, सुलतानी संकटामुळे हातात पैसे येत नव्हते. आईच्या नावावरही विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज घेतले. कर्जाचा हा बोजा 13 लाखांपर्यंत जाऊन पोहोचला.

याच कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पथक रविवारी दुपारी वाजे कुटुंबीयांच्या घरी धडकले. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर टोकाचं पाऊल उचलत वसुली पथकाच्या समोरच मायलेकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसरीकडे बँकेने शेतकरी कुटुंबाचे आरोप फेटाळले आहेत. ”बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांचा छळ करण्यासाठी जात नाहीत, तर वसुलीसाठी जातात, बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुली मोहिम सर्वत्र सुरु आहे. 12 वर्षांपासून वाजे कुटुंबीयांकडे कर्ज थकीत आहे. त्याची विचारणा करण्यासाठी गेलो असता वाजे कुटुंबीयांनी वसुली पथकाची गाडी फोडली,” असा दावा बँकेने केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)