धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सुमित राघवनचे रोमॅण्टिक गाणे  

बॉलीवुडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर माधुरी दीक्षित आता मराठी सिनेमाला प्रारंभ करीत आहे. माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकार तिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अभिनेता सुमित राघवन ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने ‘धकधक गर्ल’ माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या रोमॅण्टिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच ‘बकेट लिस्ट’ची टीम मलेशियातील लंकावी येथे जाऊन पोहोचली असून या गाण्याचे बोल ‘तू परी’ असे आहेत. बॉलिवूड गाजवणारी ही परी ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटातून आपल्या समोर अवतरणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.

What is your reaction?
25 :thumbsup:
6 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)