धंदेवाईक लैंगिक शोषण आणि मुलींचे पुनर्वसन (भाग-१)

धंदेवाईक लैंगिक छळातून (कमर्शिअल सेक्‍शुअल एक्‍सप्लॉयटेशन-सीएसईसी) बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलींना न्यायासाठी द्यावा लागत आहे दीर्घ, कठीण लढा; दोषींना दिले जाणारे अभय, फसवणूक आणि अन्य अनेक अडथळे बळजबरीने वेश्‍याव्यवसायात आणलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करण्यासाठी वाहून घेतलेल्या “सेव्ह अ गर्ल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने टाटा समाजविज्ञान संस्थेच्या सहयोगाने तयार करण्यात आलेला एक सखोल अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे.

भारतातील सीएसईसी केसेसमध्ये आरोपीला दोषी ठरवून शिक्षा होण्याचे प्रमाण अन्याय आणि अत्यंत कमी आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. धंदेवाईक लैंगिक शोषण हा मानवी गुलामगिरीचा सर्वांत वाईट प्रकार आहे, असे या अहवालात म्हटले आहे. यापुढे जाऊन या अहवालाने व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण संबंधितांशी झालेल्या चर्चेतून हाती आलेल्या काही शिफारशी मांडण्याचा प्रयत्न केला. या शिफारशी अमलात आणल्यास अधिक प्रभावी न्यायदान प्रक्रियेद्वारे यातील गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यासाठी जबाबदार धरणे शक्‍य होईल. हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल असून तो या क्षेत्रातील अनेक पीडित तसेच सुटका झालेल्या व्यक्तींसोबतच्या सखोल चर्चांवर आधारित आहे.

धंदेवाईक लैंगिक शोषण आणि मुलींचे पुनर्वसन (भाग-२)

दोषीला शिक्षा मिळण्याच्या प्रक्रियेतील कच्चेदुवे अगदी बचाव झालेल्या व्यक्तीपासून सुरू होतात. तसेच न्यायदानाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या वकील, सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या स्तरावर कच्चे दुवे आढळतात, असे या संशोधनात लक्षात आले आहे. या संघटित गुन्ह्यांचे प्रमुख लक्ष्य बहुतांशी अल्पवयीन आणि तरुण मुलीच असतात. त्यांना पळवून आणणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि या प्रकरणात पकडले गेल्यास शिक्षा होण्याचे प्रमाण धक्कादायकरित्या कमी असल्याने जोखीमही फारशी नसते. याशिवाय, मुलींची सुटका करण्याचे तसेच त्यांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांपुढे पूर्ण क्षमतेने काम करू शकतील असे वकील परवडण्याजोग्या दरात मिळवणे हे मोठे आव्हान असते. 16 वर्षांखालील मुलींची विक्री करत असल्याची कबुली 82 टक्के कुंटणखान्यांच्या मालकांनी दिली आहे. ही समस्या एवढी तीव्र असूनही 2015 मध्ये या प्रकरणात केवळ 55 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. भारतामध्ये या गुन्ह्यांना दिले जाणारे संरक्षण मोडून काढण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेने तातडीने एकत्र येण्याची गरज आहे यावर हे आकडे भर देतात.

– शिखा फिलिप्स


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)