द मॅजिक पाइप

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गायत्री तांदळे

जीवसृष्टी जगण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पाणी वापरासंदर्भात जनजागृती करणाऱ्या अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. पथनाट्यापासून ते पर्यावरण पूरक फिल्म्सद्वारे पाण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोचविण्यात आले. पथनाट्य फिल्म्स पाहिल्यावर होणार परिणाम हा अगदी अल्पकालीन स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात पाण्याची समस्या तुलनेने कमी जाणवते. त्यामुळे कदाचित शहरी भागात सर्वाधिक पाणी वाया घालवले जाते. शहरातील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. पाण्याच्या समस्येवर भाष्य करणारी मद मॅजिक पाइपफ ही लघुकथा आज आपण पाहणार आहोत.

“द मॅजिक पाइप’ या लघुकथेतील युवक कार धुण्यासाठी पाइप नळाला लावतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो फोन रिसिव्ह करून तो बोलता बोलता कारवर पाइपने पाणी मारत असतो. बोलण्याच्या नादात तो पाइप हातात धरून नळ बंद न करताच बोलत उभा असतो. दोन लहान मुलं पाण्याच्या शोधात तो युवक राहत असलेल्या सोसायटीजवळ येतात. भिंतीवर चढून ते सोसायटीच्या टाकीतील पाणी घेता येईल का याचा विचार करत असतात. तेवढ्यात त्या युवकाचे लक्ष त्या दोघांकडे जाते अन तो त्या मुलांना आतमध्ये बोलावतो. पाणी मिळणार या आशेने ती मुलं आनंदाने पळत येतात. ती मुलं येई पर्यंत नळाचे पाणी जाते. अन तो युवक विचारात पडतो. तर त्याला त्याने आधी फोनवर बोलताना पाणी कसे वाया घालवले त्याचे चित्र डोळ्यासमोर येते. मग तो पटकन हातातील पाइप ठेवून घरातून बादली आणि मग घेऊन येतो. नळाला लावलेला पाइप काढून तो बादलीत टाकतो. पाइपचे दुसरे टोक हातात धरतो त्याने वाया घालवलेले पाणी तो पाइप पुन्हा शोषून घेऊ लागतो. त्यामुळे बादली भरते ते पाणी तो त्या लहान मुलांना देतो व उरलेल्या पाण्यात कार साफ करतो. त्या युवकाने जर आधीच बादलीत पाणी घेऊन कार धुतली असती तर पाण्याचा अपव्यय टाळता आला असता.
“द मॅजिक पाइप’ मधील युवकाची कथा हे एक उदाहरण झाले. देशात अनेक ठिकाणी विविध माध्यमातून पाणी वाया घालवले जाते. कधी फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी जाते तर घरगुती स्वरूपातील काम करताना ही पाणी वाहत असल्याचे दिसते. जर आपण पाणी जपून वापरले तर ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे पाणी उपलब्ध होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)