‘द जर्नी ऑफ कर्म’ चा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन पूनम पांडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. पूनमसोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूरही अनेक वर्षांनंतर सिनेमात झळकणार आहे. ‘द जर्नी ऑफ कर्म’ या सिनेमात पूनम पांडेसोबत शक्ती कपूर दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. ‘द जर्नी ऑफ कर्म’ चा व्हिडिओ टीझर ३३ सेकंदाचा आहे. यात शक्ती कपूरचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तर पूनम पांडेचा बोल्ड अवतार पाहायला मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या या मुलीची ही कथा आहे. ती आपल्या आईसोबत रहात असते. आयटी इंजिनियर होण्याचे तिचे स्वप्न असते. अमेरिकेत जावून शिकण्याचे तिचे स्वप्न असते. मात्र तिच्या गरिब परिस्थितीमुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पूनम तिच्या फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार पूनम इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवते आणि यात तिला कोणतीही लाज वाटत नाही. पूनमने तिचा एक अॅप देखील लॉन्च केला आहे. ज्यात तिचे हॉट फोटोज फॅन्स पाहु शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)