द. आफ्रिकेच्या संघाला धक्का ; एबी डिव्हिलिअर्स पहिल्या तीन सामन्यांना मुकणार

मुंबई : कसोटी मालिकेत वर्चस्व गाचवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्का बसला असून आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्स दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात डिव्हिलर्सच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे पहिल्या तीन वन-डेत खेळू शकणार नाही.
डिव्हिलियर्सच्या उजव्या हाताच्या बोटाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यासाठी त्याला जवळपास दोन आठवडे लागणार आहेत. तो वॅन्डरर्समध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यामध्ये खेळेल, अशी आपेक्षा आहे. उद्या एक फेब्रुवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र एबी डिव्हिलिअर्स दुखापतग्रस्त झाल्याने आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एबी डिव्हिलिअर्स सध्या चांगल्या फॉर्मात असून कसोटी मालिकेमध्ये त्याने आफ्रिकेच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावली होती. मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेने डिव्हिलर्सच्या जागी कोणत्याही राखीव खेळाडूची निवड केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)