‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ प्रदर्शित होऊ देणार नाही-  काँग्रेस

चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे इतर मार्ग आमच्याकडे ; पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित चित्रपट ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजय बारू यांनी २०१४ साली हे पुस्तक लिहले होते. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास काँग्रेस पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रदर्शनापूर्वी तो काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दाखवण्यात यावा, अन्यथा काँग्रेस हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज्यातील युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला आहे.

सत्यजीत तांबे यांनी या चित्रपटाचे निर्माते सुनिल भोरा आणि धवल गाडा यांना एक पत्र लिहीले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आणि राजकीय कारकिर्दीवर चित्रपट बनवला आहे.

मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरमधून मनमोहन सिंग यांच्यासंदर्भातील काही तथ्ये ही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. यामुळे युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेचे नुकसान होऊ शकते, जे आमच्यासाठी स्विकारार्ह नाही. जर यामध्ये काही तथ्यहीन दृश्ये आढळून आली तर ती हटवण्यात यावी. अन्यथा, देशभरात या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे इतर मार्ग आमच्याकडे आहेत. त्यानंतर पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)