‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ट्रेलर यूट्यूब वरून गहाळ झाला ? : अनुपम खेर

भोपाळ – ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा ११ जानेवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित असून या चित्रपटामध्ये अभिनेता राम अवतार भारद्वाज हे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसतील.

दरम्यान, हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसून येत आहे,  मध्य प्रदेशा तसेच महाराष्ट्र राज्यांमध्ये  काँग्रेस नेते यांनी चित्रपटाचा ट्रेलर आपल्या फेसबुक अकांउटवर पोस्ट करत, हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवू नये, तसेच ”कोणत्याही चित्रपटगृहाने हा खोटा चित्रपट दाखवला तर होणाऱ्या नुकसानीला स्वत: चित्रपटगृहाचे मालक जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहे. यातच अनुपम खेर यांनी चित्रपटाच्या ट्रेलर ट्रेंड मध्ये आहे अशी माहिती देत सांगितले आहे कि, मात्र  You Tube वर  ट्रेलर दिसत नाही आहे असे सांगितले आहे  मात्र चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असून सुद्धा यास  39,334,104 व्यूज  मिळाले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपिन शर्मा, दिव्या सेठी, Suzanne Bernert मुख्य  भूमिका साकारताना दिसतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)