द्विलक्षीच्या दुसऱ्या यादीत दीड हजार प्रवेश

पुणे- अकरावी प्रवेशातील द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून एकूण 1 हजार 578 विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या फेरीसाठी एकूण 8 हजार 495 जागा होत्या. यापैकी 3 हजार 778 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. तर 1 हजार 578 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. तसेच 1 हजार 239 विद्यार्थ्यांना पहिला पसंतीक्रम मिळाला आहे. पहिला पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि दहावी बोर्डाचा बैठक क्रमांक ब्लॉक केला जाणार आहे. पसंतीक्रम 2 ते 10×लॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मान्य असेल तर त्यांनी दिलेल्या वेळेत ऑनलाईन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दरम्यान प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 1 हजार 243 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हा पसंतीक्रम मान्य नाही त्यांनी तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी अशी सूचना प्रवेश समितीकडून करण्यात आली आहे. प्रवेशाच्या वेळी आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी तसेच दिलेल्या पसंतीक्रमात प्रवेश घेऊन कालांतराने प्रवेश रद्द केल्यास अशा विद्याथ्रयांचाही प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि दहावी बोर्डाचा क्रमांक ब्लॉक केला जाणार असल्याचे प्रवेश समितीकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)