द्रूतगती मार्गावर अपघात 2 जखमी

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक बसून अपघात झाला. कामशेत बोगद्यात सोमवारी (दि. 19) सकाळी हा अपघात घडला. यामध्ये मोटारमधील महिला आणि पुरुष किरकोळ जखमी झाले. मात्र, त्या दोघांची नावे समजू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी कामशेत बोगद्यात समोर असणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळळी. त्यात कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)