द्रुतगती मार्गावर कार व ट्रकचा अपघात

लोणावळा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा व खंडाळा दरम्यान ट्रक व मोटारीचा अपघात झाला.

सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका मोटारीला धडक बसून झालेल्या अपघातात मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सचिन काकडे ( रा. पुणे) असे या जखमी झालेल्या मोटार चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार काकडे हे त्यांची कार क्र. (एम.एच.-14 एफबी-911) मधून मुंबईच्या दिशेने जात असताना सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची (एमएच-12/एमव्ही -4573) मोटारीला धडक बसली.

घटनस्थळी आलेले आयआरबी व देवदूत पथक, तसेच सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना काकडे यांनी अपघातग्रस्त मोटारीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी लोकमान्य रुग्णालय निगडी येथे दाखल केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)