द्रुतगती महामार्गावर शिस्त मोडाल, तर थेट फौजदारी

File photo

वाहतूक पोलीस महासंचालकांचे महामार्ग पोलिसांना आदेश

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे, धोकादायक आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर आता दंडात्मक कारवाईसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने फौजदारी गुन्हेदेखील दाखल केले जाणार आहे. द्रुतगती महामार्गावरील अपघातांची संख्या घटविण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यामध्ये रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाणे 8 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. ही बाब चिंताजनक असून, त्यामुळे पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवरील अपघातात घट होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यासाठी एक्‍स्प्रेस-वेवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी; तसेच अन्य उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी राज्याच्या वाहतूक पोलीस महासंचालक यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत अपघातांचे प्रमाण करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

द्रुतगती महामार्गावर सातत्याने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये अतिवेग आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, वाहन चालविताना चालकासह सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न करणे, लेन कटिंग व चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे आणि द्रुतगती महामार्गावर अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने यावर या मोहिमेत प्रामुख्याने कारवाई केली जाणार आहे. राज्याचे महामार्ग पोलीस आणि रायगड, नवी मुंबई व पुणे ग्रामीण पोलीसही संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहेत. दरम्यान, या कारवाई मोहिमेबरोबरच वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. एक्‍स्प्रेस-वेवर कारवाईसाठी तीन जिल्ह्यांचे ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलीस एकत्रित कार्यरत असणार आहेत. यामध्ये त्यांचे चार गट केले जाणार असून, कारवाईसाठी निश्‍चित केलेले चार मुद्दे या गटांत विभागून दिले जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)