दौंड शुगरच्या 9 व्या गळीत हंगामात विक्रमी गाळप

देऊळगांव राजे – दौंड शुगरचा नुकताच नववा गळीत हंगाम 907239.617 मे.टन ऊस गाळपाने नुकताच पार पडला. गळीत हंगाम 2017-18 मधे दौंड शुगर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तसेच बाजूच्या तालुक्‍यातील असे मिळून एवढे विक्रमी गाळप करुण 1080500 क्‍विंटल साखर उत्पादन केले आहे. यातून विक्रमी असा 11.91 टक्‍के सरासरी साखर उतारा प्राप्त झाल्याची माहिती संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 6000 मेट्रिक टन प्रतीदिन असून हा हंगाम 137 दिवस चालला. कारखान्याने याकरिता विविध ऊस विकास योजना राबवल्याने आणि परिसारातील ऊस उत्पादकांनी ऊस गाळपास देऊन सहकार्य केल्याने एवढे विक्रमी गळित करू शकलो, असे संचालक शहाजी गायकवाड यांनी सांगितले. या ऊस गाळपाचे ऊस बिल शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दराने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांचे मनपूर्वक आभार मानले. या पुढील काळात असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम, संचालक वीरधवल जगदाळे, संचालक शहाजी गायकवाड यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)